- पाच दिवसात ६५ लाखांचा दंड वसूल; वसुली होईपर्यंत कारवाई आणखी तीव्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२३) :- पालिकेच्या पाणीपट्टी थकबाकी वसुली मोहिमेअंतर्गत पाणीपुरवठा विभागामार्फत २० ते दि. २४ मार्च दरम्यान व्यावसायिक नळजोडधारकांची नळजोड तोडण्याची कारवाई करण्यात आली. तसेच काही नळजोडधारकांकडून थकबाकी वसुल करण्यात आली आहे. ही कारवाई अ.ब.क.इ.इ. फ. आणि ह विभागांतर्गत करण्यात आली.
कारवाईत महापालिकेचे प्रभाग उप अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता, मीटर निरीक्षक, प्लंबर, मजूर आणि महाराष्ट्र सुरक्षा दल जवान यांच्या पथकाने केली.
कारवाईत अ.ब.क.इ.इ.फ.ग आणि ह प्रभागाअंतर्गत अनुक्रमे १,१३,६,२७,९,९.२ असे एकूण ६७ नळजोड तोडण्यात आले. तसेच, या कारवाईत अ.ब.क.इ.इ. फ. ग आणि ह प्रभागातंर्गत अनुक्रमे १५. ६५.२.१२,८,१२,४.१६ अशा एकूण १३४ थकबाकीदारांकडून अनुक्रमे १५ थकबाकीदारांकडून १३.२५ लाख वसुली. ६५ थकबाकीदारांकडून १८.७० लाख, २ थकबाकीदारांकडून ४० हजार, १२ थकबाकीदारांकडून १० लाख, ८ थकबाकीदारांकडून २.१० लाख, १२ थकबाकी दारांकडून ७.८० लाख, ४ थकबाकीदारांकडून १ लाख, १६ थकबाकीदारांकडून १.७८ लाख अश्या प्रकारे एकूण १३४ थकबाकीदारांकडून र.रु. ६५ लाख वसूल करण्यात आले.
ही कारवाई प्रभागाचे उप अभियंता नितिन निबाळकर, मनोज जावरानी, शेखर गुरव, हेमंत देसाई, राजेश जगताप. दिनेश फाटक, संजय साळी, दिपक पाटील, चंद्रकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता प्रशांत कुंभार, संभाजी गायकवाड, विजय लाडे, श्वेता भागवत, राहुल पाटील, प्रताप पवार, ग्वालवंशी, संभाजी गायकवाड, प्रियांका शिंदे, प्रसाद आल्हाट, प्रविण वांबळे, संजय जाधव, प्रितम बाविस्कर, मीनल दोडल, सुरेश लंगोटे, शाम गर्जे, सन्मान भोसले यांनी केली. कारवाईत प्रभागाचे सर्व मिटर निरिक्षक, प्लंबर, मजूर आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान यांनी सहकार्य केले.
पाणीपट्टी थकबाकी मोहिमेतंर्गत अंतर्गत नळजोड तोडण्याची मोहिम थकबाकी वसुली होईपर्यंत आणखी तीव्र आणि शीघ्र गतीने करणेबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिलेली आहे. थकबाकीधारकांनी त्वरित सर्व थकबाकी मनपा प्रभाग कार्यालयातील कोषागारात रोखीने अथवा ऑनलाईन पध्दतीने पी.सी.एम.सी. लिंक द्वारे भरणा करावी असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना केले आहे.