न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२३) :- टाटा टियागो कंपनीची कार (एमएच१४जेए०२६३) फिर्यादीने पार्क करुन ठेवली होती. अज्ञात इसमाने फिर्यादीच्या गाडीच्या डाव्या बाजुची मागची काच फोडली. त्या गाडीमध्ये ठेवलेला २५००० रुपये किंमतीचा लॅपटॉप, १०० रुपये किंमतीची सँग, ५०० रुपये किंमतीचे लॅपटॉप चार्जर व ५०० रुपये किंमतीचे टायटन कंपनीचे घड्याळ असे साहित्य चोरुन नेले आहे.
हा प्रकार (दि. २३) रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास जय गणेश साम्राज्य चौक, भोसरी येथे घडला. फिर्यादी स्वप्निल वचन ढेरे (वय ३२ वर्षे, धंदा नोकरी, रा. स्टेला टॉवर, विग नं सी-२ प्लॅट नं १३०४, डुडुळगाव, मोशी आंळदी रोड) यांनी आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १०६/२०२३ भादंवि कलम ३७९,४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.