न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२३) :- पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी आरोपीने फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर https://hdft- 99ik.web.app/ ही लिंक पाठवली. फिर्यादीने लिंक ओपन करून अपडेट केले. दरम्यान ऑनलाईन माध्यमाद्वारे आरोपीने फिर्यादीच्या एचडीएफसी बँक अकाउंटवरुन २,००,००० रुपये परस्पर काढुन घेत फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. २) रोजी रात्री ९.१५ वाजता चिंचवड येथील फ्लॅट नं. ५०३, पदमांश बिल्डींग, माटे शाळेजवळ, श्रीधरनगर येथे घडली.
फिर्यादी रितेश तिलकराम बोहरे (वय ४३ वर्षे, धंदा नोकरी, रा. श्रीधरनगर, चिंचवड) यांनी आरोपी अज्ञात मोबाईल नं. ८९८७५१५८९१ वरील धारक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १५०/२०२३ भा.द.वि. कलम ४१९, ४२०, माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ सी ६६ डी नुसार गुन्हा दाखल केला आहे.