न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२३) :- पेट्रोलींग दरम्यान वाकडमधील काळाखडक येथून दारुची वाहतुक करणारा पिकअप शहरात जाणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी काळाखडक येथे सापळा रचुन पांढऱ्या रंगाचा महीद्रा पिकअप (MH-१४-JL-३५९४) थांबवुन त्यातील चालकास ताब्यात घेतले.
पिकअपची झडती घेतली असता त्यामध्ये गावठी हातभट्टी दारूने भरलेले एकुण ३६ मोठे हत्ती कॅण्ड मिळून आले. गावठी हातभट्टी दारुचा एकूण ८,२६,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जप्त करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने गावठी दारु लोणी काळभोर येथुन आणल्याचे तपासात सांगितले.
संदीप रामकिशोर सरोज (वय ४५ वर्षे रा. राजेश पान स्टॉल बाजुला कुदळवाडी, मुळ रा. कलवापुर ता.सोरांव जि. इलाहाबाद, उत्तरप्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर ३११/२०२३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ), ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त, परि २, श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे-१, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे-२, सपोनि संतोष पाटील, सपोफो विभीषण कन्हेरकर, सपोफो. बाबाजान इनामदार, सपोफो. राजेंद्र काळे, सपोफो. राजेंद्र मारणे, पोहवा. वंदू गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा.प्रमोद कदम, पोहवा संतोष बर्गे, पोना.प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना.राम तळपे, पोशि.अजय फल्ले, पोशि. तात्या शिंदे, पोशि.कौतेंय खराडे, पोशि. भास्कर भारती, पोशि.स्वप्निल लोखंडे, पोशि. सौदागर लामतुरे, पोशि.विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर यांनी मिळुन केली आहे.