न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२३) :- चिखलीतील आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सालाबादप्रमाणे ‘फूड फेस्टिवल २०२३’ चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. भारतीय भौगोलिक प्रदेश रचनेनुसार विविध खाद्य पदार्थांची रेलचेल दिसून आली.

या फूड फेस्टिवलचे उ्घाटन भाजपच्या आ. उमा खापरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, बीजेपी महिला शहर कार्यकारिणीच्या शितल वर्णेकर, प्राचार्य प्रदीप फुलकर, विभाग प्रमुख अमोल भागवत, विभाग प्रमुख अनिकेत वंजारी, प्रशासकीय प्रमुख प्रतिक्षा डफळ यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव, विकास साने, हॉटेल व्यवस्थापनातील प्रमुख अतिथी, राज्यातील विविध जिल्ह्यामधून आलेले प्राचार्य, शिक्षक वर्ग व संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा फूड फेस्टिवल आयपीएलच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या उद्योजगता विकासासाठी आयआयबीएमच्या माध्यमातून ६० पेक्षा अधिक सुप्रसिद्ध खाद्य पदार्थ प्रदर्शनात विक्रीस ठेवले होते. मनोरंजन, अनुभव कथन, मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा केले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संस्थेचे अध्यक्ष
दरम्यान डॉ. धनंजय वर्णेकर यांनी संस्थेच्या १८ वर्षातील प्रगतीचा व कार्याचा आढावा घेतला. फेस्टिवलबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आ. उमा खापरे यांनी हॉटेल व पर्यटन व्यवस्थापनाचे करिअरसाठी असणारे महत्व अधोरेखीत केले. भाजपच्या शहर कार्यकारणी सदस्या शितल वर्णेकर यांनी फेस्टिवलचे नियोजन पाहून संस्थेतील अधिकारी, शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच प्राचार्य प्रदीप फुलकर सरांनी आदरातिथ्य क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या तज्ञ मनुष्यबळाची गरज अधोरेखित केली. विभाग प्रमुख अमोल भागवत यांनी राज्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी आजआयबीएम संस्थेमध्ये मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी येत आहेत. आजतागायत भरपूर विद्यार्थी परदेशामध्ये स्वतःच्या पायावर उभी आहेत. पुढेही मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था म्हणून आम्ही कार्यरत राहू असे संबोधले. प्रशासकीय प्रमुख प्रतिक्षा डफळ यांनी मुलींनी न घाबरता परदेशापर्यंत झेप घेतली पाहिजे. हॉटेल व्यवस्थापन, हवाई क्षेत्र, पर्यटन क्षेत्र यामध्ये मोठमोठ्या पदावर आज आयआयबीएमच्या विद्यार्थिनी काम करत आहेत. तुम्हीही या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आई-वडिलांचे नाव उज्वल केलं पाहिजे, असे बोलून विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढवला व शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद पालकवर्ग तसेच हॉटेल व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी मुलांना वेगवेगळ्या करिअरच्या संधीची माहिती दिली व शुभेच्छा दिल्या. विविध जिल्ह्यातून आलेल्या प्राचार्यांनी हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
हा भव्य दिव्य फूड फेस्टिवल विद्यापीठाचा अभ्यासक्रमाचा एक भाग होता. भारतात व परदेशात विद्यार्थी व्यवसायिक बनू शकतो, या उद्देशाने हा फेस्टिवल भरवण्यात आला. कार्यक्रमाचे सर्व व्यवस्थापन नियोजन प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन यशस्वीरित्या पूर्ण केले. आभारप्रदर्शन प्राचार्य प्रदीप फूलकर आणि विभागप्रमुख अमोल भागवत यांनी केले.












