न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च) :- महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) समाज पिंपरी चिंचवड शहराचा भव्य १३ वा वधू-वर व पालक परिचय मेळावा ज्ञानेश्वरी मंगल कार्यालय येथे महापौर राहुल जाधव व सामाजिक कार्यकत्या अर्चनाताई विनोद तापकीर, राजेंद्र खैरनार, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिठ समाज, वैशाली राऊत उपाध्यक्ष यांच्या हस्ते दिप प्रजोलन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश नढे पाटील, माजी विरोधी पक्षनेते शरद बारहाते, विलास पाडाळे, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड, अध्यक्ष संतोष भालेकर, सुनील पवार, निलेश पवार, विशाल जाधव, संजय रोकडे, सुनील अभंग, किरण लोंढे, प्रशांत दळवी, नरेश कदम, कृष्णा पिसाळ, किशोर रोकडे, पाटोळे आदी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे समाजाचे होतकरू मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापौर जाधव यांनी समाजाला चांगले मार्गदर्शन केले व संपूर्ण परिठ (धोबी) समाजास या कार्या बद्दल त्यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सर्व मान्यवरांचे आभार वैशाली राऊत यांनी केलं.