न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल व्होकेशनल स्किल्स स्टडी व रोजगार संधी उपलब्ध करुन देणेकामी मे. ग्राडड्रिम ( अर्थसेतू) यांचे मार्फत परदेशातील शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.
याकामी दि. १६ मार्च २०२३ रोजी विद्यार्थी व पालक यांचेसाठी पहिल्या फेजमध्ये एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यास उत्स्फूर्त मिळाला त्याचाच पुढील भाग म्हणून दि. ३१ मार्च २०२३ रोजी दुस-या फेजसाठी रेजिस्ट्रेशन झालेल्या साधारण ३४० विद्यार्थ्यांची ऍप्टीट्युड टेस्ट मोरवाडी आय.टी.आय येथे आयोजित करण्यात आली.
टेस्टसाठी जनरल नॉलेज, इंग्रजी ग्रामर, इंग्रजी ग्रामर डायग्नोस्टीक व इंग्रजी निबंध असे विषय अर्थसेतू कडून निवडण्यात आले होते. सदर टेस्टसाठी आय. टी. आयतील व बाहेरील असे साधारण १६० विद्यार्थी समक्ष हजर राहिले. ऑनलाईन पध्दतीने ( निबंध विषय वगळून ) त्यांची मोबाईल वर परिक्षा घेण्यात आली. उत्साही वातावरणात व आनंदाने सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला होता. मे. ग्राड ड्रिम ( अर्थसेतू ) चे सी.ई.ओ. सुनित सुरवसे यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना टेस्टसाठी हजर राहण्यास शक्य झाले नाही, त्यांचेसाठी लवकरच ऑनलाईन टेस्टचे नियोजन करण्यात येईल.
यावेळी मे. ग्राड ड्रिम ( अर्थसेतू ) चे सी.ई.ओ. श्री. सुनित सुरवसे व त्यांचीटिम तसेच मा. प्राचार्य, गटनिदेशक, निदेशक, कर्मचारी व परदेशी शिक्षणासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.












