न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च) :- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. राजेश किशोर पुणेकर यांची भारत सरकार नोटरीपदी नियुक्ती झाली आहे. भारत सरकारच्या कायदा मंत्रालयाकडुन ही नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड. पुणेकर हे विवीध संस्थांवर कायदे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल समाज्याच्या विवीध स्तरातुन अभिनंदन होत आहे. ॲड. पुणेकर यांनी बार असोसिएशनचे अध्यक्षपदी असताना वकिलांच्या हितासाठी, विकासासाठी व हक्कांसाठी मोलाचे कार्य केले असल्याचे सांगितले जाते.
ॲड. पुणेकर यांनी सदर नियुक्ती ही मौखिक परिक्षा घेऊन करण्यात आल्याचे सांगितले तसेच बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुहास पडवळ यांनी आपल्याला विषेश मार्गदर्शन केल्याचे देखिल सांगितले. आपण समाजाचे देणे असुन, सदर पदाचा उपयोग समाजाकरीता व गरिब व गरजु वर्गाकरीता करणार असल्याचे ॲड. पुणेकर यांनी सांगितले.















