न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शहरात ”मनसे आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पक्ष स्थापने पासुन आतापर्यंत पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत भोसरी-पिंपरी-चिंचवड या तीनही विधानसभेमध्ये पक्षाचे सर्व कार्यकर्ते व नागरिकांच्या घरोघरी जाऊन भेटी-गाठीचे सत्र सुरु केले होते.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभारी किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व मनसैनिक यांच्या घरोघरी जाऊन, कार्यकर्ते व शहारातील सार्वजनिक मंडळ व जेष्ठ नागरीक यांच्या भेटी घेण्यात आल्या. या भेटी-गाठीमध्ये पक्षाचे ध्येय धाेरण व पक्षाविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये गेले १५ ते २० दिवस पिंपरी, भोसरी, चिंचवड या तीनही विधानसभा पिंजुन काढण्यात आल्या. यामध्ये ३५०० कार्यकर्ते व मनसैनिक यांच्या भेटी-गाठी घेण्यात आल्या.
यादरम्यान पिंपरी-भोसरी-चिंचवड अशा तीनही विधानसभेतील मनसैनिकांमध्ये एक उत्साह व नवचैतन्य संचारले होते. नुकताच पिंपरी विधानसभेचा दौरा संपवून, ‘मनसे आपल्या दारी’ कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या मोहिमेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, पक्षविस्तार करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.
या दौऱ्याच्या नियोजनामध्ये शहर उपाध्यक्ष बाळा दानवले, राजु साळवे, विद्यार्थी सेनाध्यक्ष हेमत डांगे, महिला सेना अध्यक्ष अश्विनी बांगर, उपाध्यक्ष सिमा बेलापुरकर, अनिता पांचाळ, संगिता देशमुख, स्नेहल बांगर, रुपाली गिलबिले, सुजाता अरुण काटे, मिना गटकळ, विभाग अध्यक्ष विशाल मानकरी, राहुल जाधव, मयुर चिंचवडे, शाम जगताप, संजय यादव, दत्ता देवतरसे, सचिव रुपेश पटेकर, उप -अनिकेत प्रभु, प्रतिक शिंदे, विकास कदम, रोहित काळभोर, सुशिल पोतदार, नितीन चव्हाण, पंकज दळवी, के. के. कांबळे, अक्षय नाळे, ओंकार पाटोळे, मिलिंद सोनवणे, सुधीर जम, एँल्केस मोजेस, करण मुर्ती आदींनी परीश्रम घेतले, असे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.
‘















