न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १९) :- श्री. क्षेत्र टाळगाव चिखली येथे ”एक गाव एक शिवजयंती” या उत्सवासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती.
या पत्राची दखल घेत, महापालिकेने चिखली परिसरात रस्त्यांची विकासकामे सुरु केली आहेत. काही कालावधीतच इतरही कामे पूर्णत्वास आणली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दिनेश यादव म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरामधील सर्वात मोठी शिवजयंती चिखली भागात आयोजित केली जाते. हजारो शिवभक्त चिखली भागात शिवजयंती निमित्त एकत्र येतात. महापालिकेच्या वतीने परिसरात सोई-सुविधा पुरविणे त्यासाठी आवश्यक होते. महापालिकेने विकासकामे चालू केली असल्यामुळे, परिसरातील शिवभक्तांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.















