न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२३) :- रावेत सर्व्हे नं. ७४ हिस्सा नं. १अ / १अ /६ मधील प्लॉट नंबर ३५ च्या १ गुंठा जागेवर बेकायदेशिर अक्रिमण करुन आरोपी यांनी फिर्यादी यांच्या त्या जागेवर घर बांधुन फिर्यादींची जागा बळकावुन त्यांना तुम्ही माझे घर पाडुन त्यातील वस्तुंची चोरी करुन जातीवाचक शिवीगाळ केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हि घटना (दि २५/०३/२००९ ते दिनांक ११/०४/२०२३ पर्यंत रात्री १०:०० वाजता घडली. महीला फिर्यादीने आरोपी विठ्ठल निलकंठ चव्हाण (वय ६६ वर्षे), उदय विठ्ठल चव्हाण (वय ३८ वर्षे रा. घर नंबर ११०४ ब, विजयनगर, काळेवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
रावेत पोलिसांनी दोघांच्या विरोधात १६८/२०२३ भा.द.वी.स. कलम ३४१, ४४७ सह अनुसचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ कलम ३ (१) (क़), ३(१)(ङ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.