न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२३) :- तडीपार केल्याचा आदेश घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये चल असे वडील आरोपी मुलाला म्हणाले. त्यावरुन चिडून दारु पिवून आरोपी मुलाने तुझ्यामुळे मला तडीपार केले आहे. तु माझ्याकडे इतके दिवस लक्ष दिले नाही, तुच मला तडीपार करायला लावले आहे. आता तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत फिर्यादी वडिलांच्या डोक्यात पाठीमागील बाजूस जोरात दगड मारुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीची पत्नी मध्ये आली. तिने आरोपी मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने आईला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना ( दि. २७) रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास थेरगांव येथे घडली.
फिर्यादी महादेव जालिंदर चव्हाण (वय ४५ वर्षे, थेरगांव) यांनी आरोपी ऋषीकेश महादेव चव्हाण (वय २४ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ४१८/२०२३ भा.द.वि. संहिता कलम ३०७, ३२३,५०६ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.


















