न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०२३) :- फ्लॅट भाडयाने देण्यासाठी ९९ acres या सोशल वेबसाईटवर ऑनलाईन जाहीरात दिली. आरोपीने फिर्यादीला फोन, मेसेज व कॉल करुन त्यांचा फ्लॅट भाडयाने घेतो, असे सांगितले. दरम्यान आरोपीने फिर्यादीला वेळोवेळी कारणे सांगत वेगवेगळ्या बँकेचे खाते नंबर देत त्यावर पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादीच्या फ्लॅट भाडयाचे डिपॉझीट न पाठविता व पैस परत न करता त्यांची ९९,००० रुपयाची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ३०/०४/२०२३) ९९ acres या सोशल वेबसाईटवर ऑनलाईन प्रॉपर्टीवर दिनांक ०१/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता फिर्यादीच्या राहत्या घरी मोबाईल फोनवर घडली.
फिर्यादी प्रविण सुभाषराव कुलकर्णी (रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांनी शिवकुमार तिवारी (पुर्ण नांव व पत्ता माहीत नाही), ७८४७८६२०८७, कॅप्टन जोरासिंग बरीक (पुर्ण नांव पत्ता माहित नाही, मोबाईल नंबर ८५०९४१४८४९) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी २९५/२०२३ भा.दं.वि. कलम ४०६, ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.


















