न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- पिंपळे गुरव येथील गारवे लॉन्ससमोरील बीआरटी बॅरीकेडसच्या मोकळया जागेतुन फिर्यादीचा चुलत पुतण्या व त्याचा मित्र रस्ता क्रॉस करीत होता. त्यावेळी अचानकपणे टोयटो इटवास कारवरील आरोपी चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत वाहन निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीच्या पुतण्यास जोराची धडक दिली.
गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे. हा अपघात (दि. ४) रोजी सकाळी ८.४५ वा. सुमारास घडला.
फिर्यादी संतोष बजरंग तांबे यांनी आरोपी चेतन बाळु महींद्रकर याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी २०६/२०२३, भा.द.वि कलम ३०४(अ),३३७,३३८,२७९, मोटार वाहन कायदा १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.