न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्ती कर विभागाने गुरुवारी छापे घातले. प्राप्ती कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन कारवाई केली.
या कारवाईत काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती मिळतेय. पिंपळे सौदागर, पिंपरी कम्प, आणि पुण्यातील पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटी येथे ही कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक सविस्तर माहिती मिळू शकली नाही.