- रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते रुपेश चांदेरे, संदीप कांबळे, अनिल गावडे, शाळेतील शिक्षक फहाद खान, रहीम शेख व शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीला पुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना झाली. शिक्षक फहाद खान यांनी गौतमबुद्ध यांच्याबद्दल माहिती सांगितली.
अरुण चाबुकस्वार म्हणाले, ” मी देव नाही किंवा त्याचा दूत नाही. ईश्वर आहे की नाही त्यापेक्षा माणूस आहे आणि त्याचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते सोडवण्याचा मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्ग होय. दुःखी जीवनाला चमत्काराने किंवा कर्मकांडाने नव्हे, तर प्रयत्नाने सुखी बनवता येते.”
सूत्रसंचालन फहाद खान तर रहीम शेख यांनी आभार मानले.