न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी आरोपीला पोलिसांनी तडीपार केले होते. दरम्यान कोणतीही परवानगी न घेता पोलिसांच्या आदेशाचा भंग करुन आरोपी महात्मा फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे कमरेला लोखंडी कोयता लावुन फिरत होता.
तसेच त्याने विनापरवाना, बेकायदेशीररित्या लोखंडी तलवार स्वतःजवळ बाळगली होती. हा प्रकार (दि. ४) रोजी सायंकाळी ७.०० च्या सुमारास महात्मा फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आला.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी १८४/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १४२ व ३७ (१) सह १३५ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३,७ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चन्नाप्पा परशुराम सुतार (वय २२ वर्षे, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.