न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- शारजा, दुबई येथे आरोपीने फिर्यादीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीकडुन वेळोवेळी त्याचा आरोपी फायनांशियल मॅनेजर याच्या फोन पे नंबरवर रक्कम रुपये ७०,००० रुपये पाठविण्यास भाग पाडले.
फिर्यादीला दुबईचा खोटा व्हिसा व ईन्शुरन्स पाठवला. त्यांना दुबई येथे नोकरी न देता त्यांचा विश्वासघात करीत पाठविलेल्या रकमेचा अपहार करुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे. ही घटना (दि १/६/२०२२ ते ते जुन २०२२ पासुन ते दि. ०४/०५/२०२३) पर्यंत तक्रारदार यांच्या मोबाईलवरून फोन पे द्वारे घडली.
फिर्यादी प्रतिक अमृत चव्हाण (रा. काळेवाडी) यांनी आरोपी अनिल दरेकर (रा. नाशिक) व त्याचा फायनांशियल मॅनेजर देविदास सुखदेव जाधव (दोघांचे पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ४३७/२०२२ भा.दं.वि. सहिता कलम ४०६, ४२० नुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.