न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च) :- मावळ लोकसभेची उमेदवारी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जाहीर झाली आहे. त्यामुळे पार्थ यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार पायाल भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
याबाबत अजित पवार यांनी पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिका-यांची आज गुरुवार (दि. २१) रोजी रावेत येथे बैठक घेतली.
यात बोलताना अजित पवार म्हणाले की, ”पिंपरी चिंचवड महापालिकेत आमची सत्ता असताना आजी-माजी नगरसेवकांना विविध पदे देत, आजपर्यंत मी भरभरुन दिले आहे. आता मला द्यायची वेळ आली आहे, तुम्ही कशा पद्धतीने देता? हे मी पाहतो. तुमच्या हातामध्ये आहे. कोणी दगाफटका करु नका, पार्थ नव्हे स्वत: उमेदवार असल्यासारखे काम करा, दगाफटका झाल्यास निवडणुकीनंतर प्रत्येकाला जाब विचारणार”, अशी तंबीच अजित पवार यांनी उपस्थितांना दिली आहे. त्यामुळे गट-तट विसरून कामाला लागण्याशिवाय उपस्थितांसमोर कोणताच पर्याय शिल्लक राहणार नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे.











