न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च) :- अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा वाढदिवस आज गुरुवार (दि. २१) रोजी रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे साजरा झाला. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या हस्ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वतः पार्थ पवार उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमास शहराध्यक्ष शहरात संजोग वाघेरे, नगरसेवक मयूर कलाटे, युवा नेते कुणाल थोपटे, नगरसेविका उषा वाघेरे, शीतल काटे, मंगला कदम, उषा काळे, अपर्णा डोके, नगरसेवक डब्बू आसवानी, किशोर भेगडे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवा नेते सागर तापकीर, विशाल भालेराव आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पार्थ पवार म्हणाले की, ”मला आता जे मिळतंय ते शहर राष्ट्रवादीने शहरात केलेल्या चांगल्या विकासकामांमुळेच. त्यांच्या कष्टाने”. बारणे यांच्या टीकेला पार्थ यांनी ”विरोधकांना बोलण्याचा आनंद घेऊ द्या, मला काम करण्याचा आनंद घ्यायचाय” असे उत्तर दिले. राष्ट्रवादी डावलून पक्षांतर केलेल्या उमेदवारांबद्दल बोलताना पार्थ यांनी ”निवडणुका आल्या की पक्षात आदलाबदल सुरूच असते. त्याचा पक्षावर कसलाही परिणाम पडणार नाही. ते जसे पक्ष सोडून जात आहेत. तसेच, आम्ही पण इतर पक्षातले नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीत समावून घेत असतो. त्यामुळे हे चढउतार राजकीय पक्षांना असतातच. यात नवीन असे काही नाही”, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रत्येकाला वैयक्तिकरित्या भेटून पार्थ पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देता याव्यात, यासाठी संजोग वाघेरे, मयूर कलाटे आणि कुणाल थोपटे यांनी पुढाकार घेत कार्यक्रमाचे नियोजन केले होते.















