न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च) :- भाजपने देशात, राज्यात व स्थानिक ठिकाणी मातब्बर नेत्यांचे पक्षात प्रवेश घडवून आणले आहेत. त्यात नगर जिल्हा तर त्यांनी हादरवून सोडला आहे. राष्ट्रवादीच्या खंबीर नेतृत्वामध्ये खिंडार पाडून त्यांना भाजपवासी केले.
परंतु, असाच मोठा झटका पिंपरी चिंचवड शहरात भाजपला बसला आहे. भाजपचे जेष्ठ नेते आझम पानसरे यांचा मुलगा निहाल पानसरे याचा आज गुरुवार (दि. २१) रोजी भोसरी या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आझम पानसरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीचा हा परिपाक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.











