न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२३) :- इंद्रायणी नदीवरील जुना पूल मोडकळीस आला आहे. या पुलावरून अद्यापही वाहतूक सुरू आहे. एखादा अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
देहूगाव एक धर्मिक स्थळ असून याठिकाणी अनेक सोयीसुविधा भाविकांसाठी प्रशासनाने केल्या आहेत. राज्यातून आणि भारतातून अनेक भाविक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. इंद्रायणी नदीवरील जुन्या पुलाचा पश्चिमेकडील कठडा अनेक वर्षांपासून मोडलेल्या अवस्थेत आहे. त्यानंतर नवीन पूल उभारला असूनही जुन्या पुलावरून रहदारी खूप असते.
या भागातील वाहन चालक गावात येण्यासाठी याच पुलाचा वापर करतात. धोका असा फलक लावला होता. परंतु, तोही खाली पडला आहे. याच ठिकाणी येता जाता काही नागरिक कचरा टाकतात. दिवा बत्ती नसल्याने रात्रीच्या वेळी एखादे वाहन नदीत पडून मोठी दुर्घटना होऊ शकते. संबंधित प्रशासनाने ताबडतोब दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


















