न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च) :- शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष तथा शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी पाण्याची नासाडी टाळुन, शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने पदाधिकारी व कामगार बंधूं तसेच सर्व जाती-धर्माच्या जनतेसोबत धुलीवंदन साजरी केली.
यावेळी पिंपरी विधानसभेतील शिवसैनिक व शिवशाही व्यापारीसंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली धुलीवंदन उत्सव मोठ्या आनंदाने पाण्याच्या नासाडी टाळून साजरा करण्यात आला.
यावेळी रविकिरण घटकार, दत्ताभाऊ क्षिरसागर, गणेश आहेर, युवराज दाखले, गोरख पाटील, मारूती म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, आमित आहेर, सौरभ शेंडगे, सौरभ क्षिरसागर, साईराज दाखले, पृथ्वीराज दाखले, सुरज क्षिरसागर, साक्षी क्षिरसागर आदी उपस्थित होते.











