न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च) :- कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागल्याने कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची पाण्याअभावी फरफट होऊ नये, याकरीता सामाजिक बांधिलकीच्या नात्याने व जागतिक जलदिनाचे औचित्य साधत चिखली येथे आज शुक्रवार (दि. २२) रोजी स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी पाणपोईचे उद्घाटन केले आहे.
वै. ह. भ. प. वामन महाराज यादव यांच्या स्मरणार्थ व आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंचच्या वतीने नागरिकांसाठी या पाणपोईचा उपक्रम मागील तीन वर्षापासुन अखंड सुरु आहे
सामाजिक संस्थांनी सुरु केलेल्या पाणपोईची प्रेरणा घेऊन, तहानलेल्यांची तहान भागविणे यातच खरे समाधान असल्याचे, यादव यांनी सांगितले.











