न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २२ मार्च) :- शिवसेनेची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन पहिली यादी जाहीर केली आहे. आता लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यात मावळ लोकसभेतून श्रीरंग बारणे तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव, ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक महत्त्वाची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत २) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
३) उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर ४) ठाणे – राजन विचारे
५) कल्याण – श्रीकांत शिंदे ६) रायगड – अनंत गिते
७) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत ८) कोल्हापूर – संजय मंडलिक
९) हातकणंगले – धैर्यशिल माने १०) नाशिक – हेमंत गोडसे
११) शिर्डी – सदाशिव लोखंडे १२) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
१३) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे १४) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
१५) बुलढाणा – प्रतापराव जाधव १६) रामटेक – कृपाल तुमाने
१७) अमरावती- आनंदराव अडसूळ १८) परभणी- संजय जाधव
१९) मावळ – श्रीरंग बारणे २०) हिंगोली-हेमंत पाटील
२१) उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर











