न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च) :- मावळचे विद्यमान खासदार आणि आगामी लोकसभा निवडणुकीचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार हे शुक्रवारी समोरासमोर उभे ठाकले.
निमित्त होते जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन बीजोत्सव सोहळ्याचे. तुकोबांचे दर्शन घेण्यासाठी दोघेही मंदिरात एकमेकांच्या समोरा आले.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत असे चित्र पाहायला मिळत नाही. परंतू, आज जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त हे दोन्ही उमेदवारांनी देहू नगरीत उपस्थिती लावली. दरम्यान, तुकोबांच्या चरणी माथा टेकण्यासाठी हे दोघेही एकाच वेळी मंदिरात दाखल झाले.











