न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- कुदळवाडी भागात ४० रहिवासी घरांमध्ये व २० उद्योजकांना पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे, अशा तक्रारी स्वी. सदस्य दिनेश यादव यांच्याकडे काही दिवसांपूर्वी आल्या होत्या.
याबाबत त्यांनी तातडीने पिंपरी चिंचवड मनपाच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आ. महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निधी उपलब्ध करून दिला. त्याचे आज कार्तीक लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे लवकरच पाण्याची लाईन टाकण्याचे काम पूर्ण होऊन सबंधित घरांना पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा आशावाद दिनेश यादव यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव, फ प्रभाग सभापती कुंदन गायकवाड, नगरसेविका अश्विनी जा़धव, नगरसेवक संतोष मोरे, अंकुश मळेकर, किसन यादव, दत्तात्रय मोरे, कमलाकर बालघरे, वसंत मोरे, प्रतिक मोरे, मनोज मोरे,अक्षय मोरे, कुंडलिक मोरे, रामकृष्ण लांडगे, रोहित जगताप, राहुल पांचाळ, सुरेश वाळुंज, दिपक घन, रोहित कदम, दिनेश गोत्राळे, संतोष जाधव, उत्तम बालघरे, पोलिस अधिकारी श्री नकुल नेमाणे, सौरभ मोरे, विठ्ठल महाराज गवळी, सतीश जरे, मुजफ्फर सिद्दीकी, ताजुद्दीन खान, महेश आवटे, फिरोज शेख,शुक्रराज कड, निलेश यादव, प्रकाश चौधरी आदि उपस्थित होते.















