- आयुक्तांकडून पदोन्नती रद्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- महापालिकेचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी अनुसूचित जमाती वर्गातून पदोन्नती घेतली. मात्र, त्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यांनी खुल्या वर्गातून उपअभियंता पदावरून कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळविली. ती पदोन्नती रद्द करण्यात आली आहे.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ही कारवाई केली. पोरेड्डी हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या कनिष्ठ अभियंता पदावर १७ जानेवारी १९९१ ला रुजू झाले. मात्र, त्यांना पदोन्नती समितीने १७ डिसेंबर २००७ ला त्यांना खुल्या वर्गातून कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती देण्याची शिफारस केली.
समितीने त्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १ वर्षाची मुदत दिली. मात्र, पोरेड्डी यांनी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र सादर न करता विशेष मागास वर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र २ जुलै २००८ ला सादर केले होते. त्यामुळे त्यांना उपअभियंता म्हणून पदावनत करण्यात आले आहे.















