- या तारखेपासून नोंदणीला प्रारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या जमीन संचयातील चिखली आणि भोसरीतील दोन वाणिज्य भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने देण्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी ४ मे २०२३ पासून नोंदणी सुरू होणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी कळविली आहे.
पीएमआरडीएच्या पेठ क्र. सीडीसी वाणिज्य भूखंड क्रमांक ३० गट. नं. ९०५ चिखली येथील भूखंडाचे १२७५.०० चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ आहे. तर, पेठ क्र. १०. ल.सी. २ सर्वे नं. ७७ भोसरी या भूखंडाचे २७००.०० चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ आहे. चिखलीतील भूखंडासाठी ४ कोटी ५१ लाख ४ हजार ४०० एवढे तर भोसरीतील भूखंडाचे १९ कोटी ६२ लाख १४ हजार ४०० एवढे मुल्यांकण दाखविण्यात आले आहे. तथापि, भूखंडाशी संबंधित इतर माहिती पीएमआरडीएच्या pmrda.gov. in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इच्छुक संस्थांना किंवा निविदाधारकांना eauction.gov.in या संकेतस्थळावर ४ मे २०२३ पासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. निविदेची ई-लिलाव प्रक्रिया ७ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.


















