न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली (दि. २२ मार्च) :- आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान न करणे महागात पडणार आहे. निवडणूक आयोगाने मतदान न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध एक आदेश जारी केला आहे.
त्यानुसार, मतदान न करणाऱ्या व्यक्तींची ओळख आधारकार्डद्वारे होणार आहे. तर, या कार्डद्वारे लिंक असलेल्या बँकेतून ३५० रुपये वजा होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यांसदर्भात सर्वच सरकारी बँकांना आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीदही सर्व बँकांना दिली आहे. आयोगच्या प्रवक्त्यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. देशातील सर्वच मतदारांना लक्षात घेऊनच मतदान प्रक्रियेची तयारी करण्यात येते.
त्यामुळे जे मतदार मतदानाचा हक्क बजावत नाहीत, त्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने केलेला खर्च वायफट जातो. प्रत्येकी एका मतदानासाठी आयोगाला ३५० रुपये खर्च येतो. म्हणूनच, जो मतदार मतदान करणार नाही, त्या मतदाराकडून निवडणूक आयोग ३५० रुपये वसुल करणार आहे.











