न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २२ मार्च) :- पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या समस्या, बेरोजगारी तसेच तरुण-तरुणींच्या उज्वल भविष्यासाठी पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीच्या वतीने रविवार (दि. २४) रोजी सायं. ५.०० वाजता भोसरी एमआयडीसीतील ‘टी ब्लॉक’ मधील ‘भोर रबर प्रॉडक्ट’ या ठिकाणी ‘युवा-युवती कार्यकर्ता मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी पंतप्रधान योजना, बँकिंग समस्या, कामगार समस्या, झोपडपट्टी परिसरातील मूळ झोपडपट्टी विकास योजना आणि मुक्त अर्थव्यवस्था धोरणाच्या अंमलबजावणीसाठी हाताने कष्ट करणाऱ्या कामगारांच्या रोजी-रोटी, निवाऱ्यासाठी घटनात्मक अधिकार मिळवून काम देण्याचा प्रयत्न राहील.
त्यासाठी शहरातील तरुण-तरुणी, महिला, बुद्धिवंत, निष्ठावंत स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीच्या युवा अध्यक्षा दुर्गा अभय भोर यांनी आवाहन केले आहे.











