- बँकांचे कर्ज काढून एकाची साडेतीन लाखांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२३) :- अज्ञात व्यक्तीने फेब्रुवारी २०२३ ते आजपर्यंत फिर्यादीच्या नावाचा तसेच एचडीएफसी बँक खात्याचा ग्राहक नंबर व पॅन कार्डचा गैरवापर केला.
दरम्यान च्या काळात एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स बँक, आदित्य बिर्ला फायनान्स लिमीटेड, आयडीएफसी बँक, एसआयक्रिव्हा कॅपटल या बँकेतुन वस्तु व पर्सनल लोन घेवुन एकुण ३,५२,८१९ रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी शकील जमील सगरी (रा. रुपीनगर, पुणे) यांनी अज्ञात इसम (नांव व पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली असून चिखली पोलिसांनी ३१८/२०२३ भा.द.वि. कलम ४२० नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.