न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२३) :- गायत्री गॅस सर्व्हिस दुकानात विधी संघर्षित बालक व आरोपी तसेच संस्कृती गॅस सर्व्हिस या दुकानात आरोपी हे घरगुती भरलेल्या सिलेंडरमधील गॅस मोकळ्या सिलेंडरमध्ये विनापरवाना भरत होते. आरोपींनी जिवनाआवश्यक वस्तुबाबत शासन व ग्राहकाची संगणमताने जाणीवपुर्वक फसवणुक केली आहे.
ही घटना (दि १३) रोजी १२.१० च्या सुमारास खंडेवस्ती, आंबेडकर चौक, संत नामदेव पथ, एम.आय.डी.सी. भोसरी येथे घडली.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २०२/२०२३ भा.दं.वि कलम ४२०, २८५, जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३, ७ सह (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३,४,५,६,७ नुसार नितीन मोहन वाघमारे, धनराज देवीदास बिरादार, विधी संघर्षीत बालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.