न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२३) :- टपरीमध्ये वेगवेगळया कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु व पानमसाला असा एकुण २३,५८१ रुपये. किंमतीचा माल अवैधरित्या खरेदी करुन विक्रीस ठेवला.
पोलिसांच्या गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाला याची माहिती मिळाली. (दि. १४) रोजी दुपारी १.४० च्या दरम्यान वैकुंठ मंदीराशेजारी, देहुगांव येथील सुरभी पान शॉप या टपरीवर कारवाई केली.
देहुरोड पोलिसांनी २८८/२०२३ भादवी कलम ३२८,२६९,२७०, २७२, २७३, १८८. प्रमाणे गुन्हा दाखल करून संतोष रंगनाथ खरात (वय ४३, रा. चव्हाणनगर, देहुगांव) याला बेड्या ठोकल्या आहेत.


















