न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२३) :- वाल्हेकरवाडीतील अनधिकृत बांधकामावर (दि. ११) रोजी महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी संयुक्तिक अनधिकृत कारवाई केली.
या कारवाईमध्ये २ आर सी.सी, ८ वीट बांधकाम व १ पत्राशेड असे एकूण अंदाजे २४८.०० चौ.मी. (२६६८.४८ चौ.फुट) अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.
ही कारवाई अमित पंडित क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय कार्यालय यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली. ब प्रभाग येथील धडक कारवाई पथकातील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ०२ मनपा पोलिस कर्मचारी व चिंचवड पोलिस स्टेशन ०२ पोलीस उपनिरीक्षक, ४० पोलिस कॉन्स्टेबल कर्मचारी, महाराष्ट्र पोलिस सुरक्षाबल २५ कर्मचारी यांच्या महाय्याने करण्यात आली. ही कारवाई २ जेसीबी, १० मजुर यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली.


















