- तब्ब्ल २३ कोटींचा खर्च; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिघी व डुडुळगाव येथे महापालिकेची नवीन शाळा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावातील चिमुकल्यांची शाळेसाठी पायपीट थांबणार आहे. दोन ठिकाणी शाळा इमारत बांधण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली असून, २३ कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्याचे ऑनलाईन उद्घाटन आणि भूमिपूजनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे.
हस्ते करण्यात आले.
डुडुळगाव येथील ताब्यात आलेल्या जागेवर प्राथमिक शाळा बांधण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या स्थापत्य विभागाने १९ कोटी ४ लाख खर्चाची निविदा ऑगस्ट २०२२ मध्ये काढली होती. त्यासाठी ६ निविदा प्राप्त झाल्या. त्यामधील ५ निविदा पात्र ठरल्या. यशराज ग्लोबल इन्फ्राकॉन एलएलपीची १५.२१ टक्के कमी दराची निविदा पात्र ठरली आहे.
दिघी येथील शाळा इमारतीचे उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी ७ कोटी ८१ लाख ५५ हजारांची निविदा डिसेंबर २०२२ मध्ये काढण्यात आली होती. त्यासाठी ७ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यातील ४ निविदा पात्र ठरल्या. पांडुरंग एंटरप्रायजेसने प्रथम २.८७ टक्के जास्त दर दिला. त्यानंतर तो कमी करत त्यांची १२ टक्केपेक्षा कमी दराची निविदा स्वीकारली आहे. उर्वरित देव कन्स्ट्रक्शन, एस. एस. साठे, यशांक असोसिएटस यांच्या निविदा ४ ते ७ टक्के अधिक दराच्या असल्याने स्वीकारण्यात आल्या नाहीत. या कामासाठी ६ कोटी ९२ लाख २५ हजार खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. कामाची मुदत २ वर्षे आहे. दर १० टक्के कमी असल्याने पांडुरंग एंटरप्रायजेसकडून अतिरिक्त अनामत ठेव रक्कम जमा करून घेतली आहे. स्थापत्य विभागाच्या वतीने कामाचे आदेश देत या दोन्ही शाळांचे काम मार्गी लागणार आहे.