न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- सोन्याचे दागीने व रोख रकमेच्या बदल्यात पंधरा तोळयाचे सोन्याचे बिस्कीट देतो, असे दोघा आरोपींनी फिर्यादीला आमिष दाखविले. फिर्यादीकडील ७०,३०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम घेऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना सोन्याचे पंधरा तोळ्याचे बिस्किट आहे, असे खोटे सांगितले.
पिवळ्या रंगाच्या धातुचे बिस्कीट देऊन फिर्यादी यांचा विश्वासघात करून त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार (दि. १५) रोजी दुपारी १.०० वाजता पुणे नाशिक रोड, मच्छिमार्केट जवळ, भोसरी येथे फिर्यादी या त्यांच्या भावाकडे जाण्यासाठी चाकण बसची वाट पाहत थांबल्या असताना घडला.
६५ वर्षीय महिला फिर्यादी यांनी अज्ञात दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ४२९ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ३४ नुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.