- रेकॉर्डवरील गन्हेगाराची पिंपरी पोलिसांना धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- पिंपरी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आरोपीने लोखंडी कोयता बेकायदेशिररित्या जवळ बाळगुन सार्वजनीक शांततेचा भंग केला. लोकांमध्ये दहशत करीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी पोलिसांशी धक्काबुक्की केली. त्यांच्या अंगावर येऊन, “तुम्ही गलती करताय, माझा टाईम आल्यावर दाखवतो मी कोण आहे ते” असे बोलून धमकी दिली आहे.
हा प्रकार (दि. १६) रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास नव महाराष्ट्र शाळेच्या पाठीमागे, नविन म्हाडा बिल्डींगच्या मागे मोकळ्या जागेत, पिंपरीगाव येथील सार्वजनिक ठिकाणी घडला.
पिंपरी पोलिसांनी ५३६ / २०२३ भादंवि कलम ३५३, ३५२, ५०६, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५, भारतीय हत्यार कायदा ४ २५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. करण ऊर्फ कल्ल्या चरणसिंग टाक (वय २२ वर्षे, रा. पत्राशेड, मिलींदनगर, पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.