न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- अज्ञात मोबाईल नंबर धारकाने वॉट्स अॅप प्रोफाईलवर फोबर्स मार्शल कंपनीचे चेअरमन नौशाद फोबर्स यांचा फोटो लावला. तो स्वतः नौशाद फोबर्स बोलत असल्याचे फिर्यादीला खोटे सांगितले.
मॅसेजद्वारे फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना आरोपीने प्रत्येकी ५००० रुपयांचे एकुण ८ गिफ्ट व्हाऊचर ज्याची एकुण किंमत रु. ४०,००० आहे, ते scruffy@gmail.com या ईमेल आयडीवर पाठविण्यास भाग पाडुन त्यांची फसवणुक केली आहे. हा प्रकार (दि. २८/०४/२०२३) रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास फोर्बर्स मार्शल कंपनी, कासारवाडी येथे घडला.
फिर्यादी नटराज जयरामन अय्यर (रा. १४३२, कोंढवा, पुणे) यांनी आरोपी अज्ञात मोबाईल नंबर ९१७५००५०८३०९ धारक इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ४३० / २०२३ कलम भा.द.वि. ४२०, ४१९ महिती तंत्रज्ञान अधिनिमय ६६ क, ६६ड प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
















