न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- ‘गूप्तदान करायचे आहे व ते तुमच्या हाताने करायचे आहे’ असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. फिर्यादी हे दुकानात होते. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीला पांढरी प्लास्टीकची पिशवी, त्यात झेंडूच्या फूलाचा हार, पारले गुल्कोज बिस्कीटाचा पूडा व सहा शंभराच्या आणि एक पाचशे रूपयांची नोट फिर्यादीला दाखवली. ती पिशवी फिर्यादीसमोर धरली व तूमच्या गळ्यातील सोन्याची चैन व डाव्या हातातील तर्जनी बोटातील सोन्याची अंगठी दहा मिनिटासाठी या पिशवीत ठेवा, असे फिर्यादीला सांगितले.
दरम्यान आरोपींनी हातचालाखी करून फिर्यादीचे ७०,००० रुपये किंमतीचे २८ ग्रॅम वजनाचे व ६०,००० रुपये किमतीचे दाग-दागिने घेऊन आरोपींनी पोबारा केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि १६) रोजी दुपारी १२.३० वाजता रूपान स्टॉल दूकान, सुभाष रोड, मेन बाजार, देहूरोड येथे घडला. फिर्यादी धनसींग लक्ष्मण ठाकूर (वय ६८ वर्ष, किवळे) यांनी आरोपी अज्ञात इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.