न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल दगडु शिंदे (वय २०, ओटास्किम, निगडी) याच्या मागावर पोलिसांचे गुन्हे शाखा युनिट ४ चे पथक सहा महिण्यांपासुन होते. त्याला मोठ्या शिताफिने सांगवी पोलीस स्टेशन गु. रजि. नं. १६३ / २०२३ भा. दं. वि. कलम ३७९ या गुन्हयात अटक केली. त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्याच्या कडे अटक मुदतीत कसून तपास केला. त्याने पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण भागातुन सुमारे १ वर्षापासुन चोरुन आणलेल्या एकुण ५,१०,००० किमतीच्या ११ दुचाकी हस्तगत करुन एकुण ७ गुन्हे पोलिसांनी उघडसकिस आणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-४ कडील वाहनचोरी करणारे अभिलेखारील गुन्हेगार चेक करीत रेकॉर्डवरील वाहन चोरीचे गुन्हे करणारा इसम राहुल शिंदे हा बऱ्याच दिवसांपासुन त्याच्या मुळ पत्त्यावर राहण्यास नसुन त्याने पिंपरी चिंचवड हद्दितील व पुणे जिल्ह्यातील इतर भागांतील मोटार सायकली चोरुन त्याच्या ओळखीच्या लोकांना विकल्या आहेत, अशी गुन्हे शाखा युनिट ४ ला माहिती मिळाली. पोलिसांनी कौशल्यपुर्ण तपास करुन विकलेल्या ७, लपवुन ठेवलेल्या ३ अशा मोटारसायकल / मोपेड जप्त करण्यात आल्या. रांजणगाव पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ३९५ या गुन्ह्यात मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकिस आणला आहे.
या गुन्हयातील आरोपीकडुन जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकल / मोपेड पैकी ४ मोटारसायकल / मोपेड मालकांबाबत माहिती मिळाली नाही. १ वर्षाच्या कालावधीमध्ये वाहनचोरी झालेल्या नागरीकांनी गुन्हे शाखा युनिट-४ येथे याबाबत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय/गुन्हे स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, पो.हवा. रोहिदास आडे, तुषार शेटे, मोहम्मदगौस रफिक नदाफ पोना/ वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.