न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२३) :- मोशी येथे पिंपरी-चिंचवड न्यायालयाची भव्य, प्रशस्त इमारत प्रस्तावित आहे. मात्र, त्यापूर्वी पिंपरी- चिंचवड न्यायालयाचे मोरवाडी येथून नेहरूनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतर झाले. जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या हस्ते बुधवारी नेहरूनगर येथील नवीन न्यायालय इमारतीचे लोकार्पण झाले.
पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश आर.एस. वानखेडे, न्यायाधीश एन.आर. गजभिये, न्यायाधीश आर. एम. गिरी, न्यायाधीश एम.जी. मोरे, न्यायाधीश पी.सी. फटाले, न्यायाधीश एस.पी. कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष अॅड जयश्री कुटे, सचिव अॅड. गणेश शिंदे, महिला सचिव अॅड. प्रमिला गाडे, सहसचिव अॅड मंगेश नढे, खजिनदार अॅड विश्वेश्वर काळजे, हिशेब तपासणीस अॅड. राजेश रणपिसे, सदस्य अॅड. अक्षय केदार, अॅड. स्वप्नील वाळुंज, अॅड सौरभ जगताप, अॅड. नितीन पवार, अॅड. प्रशांत बचुटे, अॅड पवन गायकवाड, सहायक अधिवक्ता साधना बोरकर व वकील बंधू-भगिनी आदींची उपस्थिती होती.
मोरवाडी पिंपरी येथील जुन्या इमारतीमध्ये सेशन कोर्ट व दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, तसेच मोटार वाहन न्यायालयाची मागणी करण्यात आली आहे. ती मागणी मंजूर होताच त्याही न्यायालयाचे कामकाज मोरवाडीतील इमारतीतून सुरू होईल. तळमजला आणि पहिला मजल्यावर प्रत्येकी दोन, दुस-या मजल्यावर सात, असे एकूण ११ कोर्ट आहेत. न्यायाधीशांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, अग्निशामक यंत्रणा या इमारतीत आहे. तळमजल्यावर दोन कोर्ट रूम, कॅन्टीन, हिरकणी कक्ष, पोलिस, पहिल्या मजल्यावर दोन कोर्ट रूम, दस्तऐवज कक्ष, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रूम, फौजदारी व दिवाणी कागदपत्रांचे कक्ष, सिव्हिल स्ट्रॉंग रूम, सर्व्हर कक्ष, झेरॉक्स रूम, मुद्देमाल कक्ष आहे.
तळघरात १४७ दुचाकी आणि ३५ चारचाकी, तळमजल्यावर १५० दुचाकी, पहिल्या मजल्यावर २७ दुचाकी, २६ चारचाकी आणि दुसऱ्या मजल्यावर ६० दुचाकी आणि आठ चारचाकी, अशा एकूण ३८४ दुचाकी व ६९ चारचाकी वाहनांसाठी पार्किंग आहे.
नवीन इमारतीमधून पक्षकारांना न्याय मिळेल. पिंपरी न्यायालयाच्या काही अडचणी आहेत. त्या कागदावर न राहता सोडवण्यात येतील. काही प्रश्नांबाबत उच्च न्यायालयाकडे प्रस्ताव पाठवले जातील.
– श्याम चांडक, जिल्हा न्यायाधीश…