- आरडा ओरडा करीत कोयते दाखवुन परिसरात दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२३) :- पिंपरीतील खराळवाडीची यात्रा संपल्यानंतर फिर्यादी मोशी येथील घरी पॅशन प्रो गाडीने जात होते. दरम्यान आरोपीने फिर्यादी जवळ येवुन “बोलके कुछ होता नही” असे म्हणत हातातील कोयत्याने डोक्यावर वार केला. तो चुकवण्यासाठी हात वर केला असता फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पोटरीवर मार लागला. त्यानंतर फिर्यादी खाली पडले. आरोपीसोबतच्या इतर दोन ते तिन इसमांनी त्यांना हाताने लाथाबुक्यांनी मारहान केली.
“काय झाले तुम्ही मला का मारत आहे” असे फिर्यादीने विचारले असता “मी कोयता भाई आहे तुला माहीत नाही का? मी तुला कॉल केले होते, तु माझा फोन का घेतला नाही, आता तुला संपवतो” असे म्हणत हातातील कोयत्याने पाठीवर, मानेवर वार केले. दुसऱ्या सह आरोपीने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या कमरेच्या खाली उजव्या सिटवर, तसचे डावे पायाच्या मांडीवर वार करुन त्यांना जबर जखमी केले. जीव वाचवण्यासाठी फिर्यादी एका घरात घुसले. तिथेही येऊन आरोपी यांनी दरवाजा तोडण्यासाठी घराच्या दवाजावर कुंडी मारुन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मोठमोठ्याने ओरडुन ‘तु घरातुन बाहेर निघ, तुला आज जिवंत सोडणार नाही, असा आरडा ओरडा करुन कोयते दाखवुन दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १६) रोजी रात्री ११.३० च्या सुमारास हॉकर्स झोन पाठीमागे दत्त मंदीराजवळ, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडला. फिर्यादी अजिंक्य अरुन टाकळकर (वय २१ वर्षे, धंदा- व्यवसाय, रा. मोशी) यांनी आरोपी आशिष रामबाबु पाल (रा. हॅपी थोट समोर पिंपरी गाव), सागर ज्ञानदेव ढावरे (वय २० रा. पत्राशेड स्मशानभुमी जवळ मिलिंद नगर पिंपरी), सोबत आलेले दोन ते तिन मुले (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ५४५/२०२३ भादवी कलम ३०७,३२३, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट कलम ४ (२५), ४ (२७) क्रि. लॉ अमेंडमेंट ३, ७ म.पो. का. कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.