न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२३) :- घरात एकटीच असताना घराचा दरवाजा बंद करुन दिराने फिर्यादीच्या ७ वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार (दि. १५) रोजी १२.०० च्या सुमारास ओटास्किम, निगडी येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी किसन वाघीरे (रा. निगडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी ३११ / २०२३ भा.द.वि कलम ३७६, ३७६ (अ), (ब),३७७ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ कलम ४, ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.