न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च) :- पिंपरी चिंचवड शहरात जशी-जशी लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे, तशी-तशी राजकीय वर्तुळात चर्चा, भेटीगाठी अशा आकस्मिक बाबींना उधाण येऊ लागले आहे.
असाच काहीसा प्रकार पिंवळे गुरव परिसरात घडला. राष्ट्रवादीचे मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार आज प्रचारानिमित्त पिंपळे गुरव परिसरात मंडळांच्या भेटी-गाठीसाठी आले होते. या परिसरात शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी या ठिकाणी भाजपचे आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनीही हजेरी लावली होती.
या ठिकाणी आमदार जगताप व उमेदवार पार्थ पवार यांची समोरासमोर भेट झाली. या भेटीत राजकीय असे काहीच घडले नाही. कालही असाच काहीसा प्रसंग तुकाराम बीज सोहळ्यात खासदार बारणे व पार्थ पवार यांच्यात घडला होता. परंतु, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातल्या वितुष्टाची कल्पना सर्वांनाच आहे. त्यामुळे पार्थ व जगताप यांचा समोरासमोर येण्याचा अर्थ राजकीय जाणकार व्यक्त करू लागले आहेत.















