न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च) :- काळेवाडी परिसरातील तापकीरनगर येथे कै. हनुमंत तापकीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी स्वी. नगरसेवक विनोद तापकीर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अभिषेक बारणे, निलेश तापकीर, नवीन तापकीर, जांभळे, डॉ. जाधव तसेच युवा प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंती निमित्त विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, असे तापकीर यांनी सांगितले.


















