न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२३) :- लग्नासाठी वय पुर्ण नाही हे माहित असताना आरोपींनी शाळेच्या दाखल्याच्या व आधारकार्डच्या झेरॉक्सवर जन्म तारखेत खाडाखोड केली. वयाचा खोटा दाखला तयार करुन तो खरा असल्याचा भासवला.
मंगल कार्यालयात हिंदू धर्म वैदिक पद्धतीने विवाह केला. हा विवाह बालविवाह प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. हा प्रकार (दि. ३) रोजी दुपारी १२.३० वाजता आळंदी येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे घडला.
समीर दस्तगीर मुल्ला, रा. रहिमतपूर, कोरेगाव, जि. सातारा यांनी आरोपी गणेश दत्तात्रेय जाधव, महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी १३८/२०२३ भादवि क ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ३४ बालविवाह प्रतिबंध आधि २००६ कलम १०, ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे.