- दुय्यम निबंधक कार्यालयातील बनावट दस्ताच्या आधारे काढले दोन कोटींचे कर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२३) :-स्व-मालकीचा फ्लॅट आरोपीने फिर्यादीला विक्री केला. फ्लॅटचे खरेदीखत करुन आरोपीने फिर्यादीला ताबा दिला, असे असताना आरोपीने फिर्यादीच्या अपरोक्ष दोन फ्लॅट हे स्वत:च्या मालकीचे असल्याचे खोटे व बनावट कागदपत्र तयार केले.
पिंपरी येथील दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयास ते बनावट कागदपत्र सादर केले. तसेच फिर्यादीच्या मालकीच्या फ्लॅटवर दोन कोटी रुपयांचे कर्ज घेवुन बेकायदेशीररीत्या दुय्यम निबंधक कार्यालयात गहाण खत म्हणजेच खोटा व बनावट दस्त तयार केला. तसेच सह आरोपीनी कोणतीही शहानिशा न करता तसेच एकाशी संगणमत करुन फिर्यादीच्या नमुद प्लॅटवर बोजा / कर्ज चढविले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
फसवणुकीचा हा प्रकार (दि ९/०३/२०१६) रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, सह दु नि हवेली क्र. १८, पिंपरी चिंचवड महानगरपालिका बिल्डींग, व्यापारी संकुल, पहीला माळा, पिंपरी येथे घडला.
फिर्यादी हेतल अल्पेश पटेल यांनी हितेश गिरीश बंगारी, अरुणा कपाडीया यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ५६८ / २०२३ भादवि कलम ४२०, ४०६, ४६७, ४६९,४७०, ४७१,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.