न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२३) :- केक अ क्लॉक या नावाने नविन बेकरी टाकण्यासाठी मशिन तसेच फर्निचर बनविण्यासाठी आरोपीने फिर्यादीकडून रक्कम घेतली. बेकरी चालू करण्यासाठी फिर्यादीकडे रोख तसेच चेकने एकूण ३,२५,००० रूपये घेवून बेकरीसाठी अॅग्रीमेंट करतो असे आमिष दाखविले.
आरोपीने फिर्यादीची फसवणूक करीत मलामत्तेचा अप्रामाणिक अपहार केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि २६/०६/२०२२ ते दि ३०/०१/२०२३) चोविसवाडी, च-होली बु येथे घडली.
महिला फिर्यादीने जियाऊल अन्सारी याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी २३० / २०२३ भादवि कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.