न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२३) :- तोंड ओळखीच्या आरोपींनी दुकानात घुसून फिर्यादी दुकानदाराची गचंडी पकडली. त्यांना लाथाबुक्कयांनी मारहाण केली. मुख्य आरोपीने फिर्यादीकडे महिन्याला ५००० रुपये हप्त्याची मागणी केली. फिर्यादीने त्याला नकार दिला. त्यामुळ आरोपींनी दुकानातील काचेची बरणी फिर्यादीच्या डाव्या भुवईवर मारून त्यांना जखमी केले. तसेच फिर्यादीला कोयत्याचा धाक दाखवुन दुकानातील गल्यातुन १७०० रुपये जबरदस्तीने काढुन घेत दुकानाची तोडफोड केली.
फिर्यादी यांनी गर्दीतील लोकांची मदत मागीतली असता कोयता लोकांवरसुध्दा भिरकावत ‘खबरदार जर तुम्ही याची मदत केली तर मी एक एकाला कापुन टाकणार, मी भाई आहे ईथला’ असे म्हणाला. त्यामुळे जमलेली लोकं आजुबाजुला सैरावैरा पळुन गेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २६) रोजी रात्री ७.३० च्या सुमारास रानतारा कॉलनी, सदगुरुनगर, भोसरी येथे घडली. फिर्यादी राजुरंजन रामबहादुर सिंग व्यवसाय (किराणा दुकान) यांनी आरोपी सचिन येरे, विजय पवळे, यश भोले उर्फ भैय्या, एक अनोळखी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ४५६ / २०२३, भा.द.वि. कलम ३९४, ३८४, ५०४, ४२७, ३४ शस्त्र अधि. ४ (२५) फौ. सु. का. कलम ३,७ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.